Good morning massage in marathi (शुभ सकाळ) .4

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो.. पण वेळ नक्कीच बदलते.. !!.शुभ प्रभात...!
मनात खूप काही असतं सांगण्यासारखं पण.... काही वेळा शांत बसणंच बंर असतं .. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं भलं असतं .. एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं... जीवन हे असंच असतं ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं ... !!!...शुभ प्रभात.....!!!
मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. || सुप्रभात ||
तुमचा दिवस आनंदात जावो. मंदिरातील घंटेला आवाज नाही, जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..! कवितेला चाल नाही, जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..! त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही, जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!! मन वळू नये, अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी, कधी विसरू नये, अशी नाती हवी… शुभ सकाळ!
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.... गुड मॉर्निंग
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते, तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.. जिवनात जगतांना असे जगा कि, आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा, आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे… शुभ सकाळ
भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, तरी चालतील पण आम्हाला तसं वागता येणार नाही. कारण घरातल्यांनी सांगितलंय कि नातं जोडायला, शिका तोडायला नको शुभ सकाळ
बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात चालताना जरा जपून चालावं,, कधी रस्तेही घात करतात झुकताना जरा जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात पाउल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात मागताना जरा जपून मागावं, कधी आपलेच भावं खातात आणि नाते जोडताना जपून जोडावं, कधी नकळत धागेही तुटून जातात...... सुप्रभात
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते.. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. कारण लोक नेहमी सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही.. "शुभ सकाळ"
फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे.🌷💐🌺 हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे... 🌞 🌺👏शुभ सकाळ👏🌺🌞
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ! !!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!
प्रेमाला उपमा नाही उपम्याला साखर नाही साखरेला ऊस नाही ऊसाला शेत नाही शेताला पाणी नाही पाण्याला विहिर नाही विहिरिला पंप नाही पंपाला वीज नाही वीजेला पैसा नाही पैश्याला नोकरी नाही नोकरीला डीग्री नाही डीग्री काँलेज नाही काँलेज मध्ये शंभर पोंरीना... some missing text good morning
प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत : : : : : : लग्न हे अलार्म सारखं असत : : : : : त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड स्वप्न पाहत रहा जो पर्यंत अलार्म वाजत नाही
प्रेम सर्वांवर करा पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!... ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल......😊 😘 *शुभ सकाळ 😘
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात... पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...😎 💐🌹😊 Good morning 😊🌹💐
प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिला पाहिजे, बोलताना शब्दांचा जपून वापर केला पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचं नसतं तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकचं निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही !! 🌹 शुभ सकाळ
प्रत्येकाच्या मनात कुठंतरी एक बिल क्लिंटन असती आपल्या हिलरी बरोबर सँसार करताना तो मोनिकाच्या शोधात असतो
प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत, म्हणून काही माणसे क्षणभर, तर काही "आयुष्यभर" लक्षात राहतात..!! 😊 Open आणि Close किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!! पण गंमत अशी आहे की, आपले मन Open त्याच्याच जवळ होते, जो आपल्या Close आहे..!! 😊 शुभ सकाळ
प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच समजते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खुप महाग विकला जातो 🍂🍃🍂🍃🍁 🙏 शुभ सकाळ 🙏
पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते... म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा... 🌻 सुप्रभात 🌻
पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात पण, माणसाची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजुन तरी सुरु झालेली नाही. म्हणून नाती जपा. आनंदात काय परकेसुद्धा सामील होतात पण, न बोलवता दु:खात जे सामील होतात तेच खरे आपले असतात.....!!! 💐😊 ❤शुभ सकाळ❤ 😊💐
पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो, मन जुळण्यासाठी नांत हव असत, नांत्यासाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे? " मैत्री " मैत्रीच नांत कस जगावेगळ असत, रक्ताचं नसल तरी मोलाच असत... शुभ सकाळ आपला दिवस आनंदाचा जाओ
पाण्याने भिजलेली … थंडी ने शहारलेली … विजांच्या कडकडाटाने घाबरलेली … पावसाच्या थेंबांनी नटलेली… ओलाव्याने सजलेली … छत्रीत लपलेली… चिखलावर थोडीशी रागावलेली… पण वार्याने सुखावलेली … दगडा दगडावर पाय टाकत चाललेली … स्वतः ची स्वतःच सावरलेली… खोटी खोटी रुसलेली … थोडीशी लाजलेली … माझ्याशी हसलेली … जोराच्या पावसात …. काळ्या ढगांच्या काळोखात … छत्र्यांच्या गर्दीत …. खरंच ती … ती फार …. सुंदर दिसत होती …
पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो., त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते.. नशीबापेक्षा... ...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा... कारण उद्या येणारी वेळ... आपल्या नशीबामुळे नाही... तर कर्तृत्वामुळे येते... 💐 शुभ सकाऴ💐
पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली चौथा नमस्कार आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला. शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो
पहाटेचा गार वारा तुझा स्पर्श भासतो, शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो, अवखळ झ-यागत नादातच वाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो.. कुणालाही उमजेना तो असा का वागतो, चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो, तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी तुझे स्वप्न पाहतो..
पहाटे पहाटे सकाळची प्रसन्न वेळ वासुदेवाची मधुर वाणी मोरपिसाची सुंदर टोपी घालुन दुरुन येणारा घंटीचा घंटानाद् आरतीचा आवाज गोट्यातील गायीचे वासरासाठी हंबरणे ... पक्षांचा चिवचिवाट सर्वांची आपापली गडबड् यातुन आजच्या दिवसाची सुंदर सुरवात मंगलमय होऊ दे...... शुभ प्रभात. शुभ प्रभात.
पहाटे पहाटे सकाळची प्रसन्न वेळ वासुदेवाची मधुर वाणी मोरपिसाची सुंदर टोपी घालुन दुरुन येणारा घंटीचा घंटानाद् आरतीचा आवाज गोट्यातील गायीचे वासरासाठी हंबरणे ... पक्षांचा चिवचिवाट सर्वांची आपापली गडबड् यातुन आजच्या दिवसाची सुंदर सुरवात मंगलमय होऊ दे...... शुभ प्रभात. शुभ प्रभात.
पहाटे पहाटे मला जाग आली ; चिमण्यांची किलबिल कानी आली ; त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ; उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली . !!~!! सुप्रभात !!~!!
पहाट झाली! पहाट झाली! चिमण्यांची किलबिलाट झाली अन जाग आली… त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली, उठा… Whatsapp बघायची वेळ झाली…! शुभ सकाळ!
पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही.... जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात.... आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात... , पण दुर्गुणांवर चर्चा सुरु झाली की मुकेही बोलू लागतात.... 🌼🌸🌺 शुभ सकाळ 🌺🌼🌸
निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात. तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात. एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल, पण मनाने कधीच कमजोर होऊ नये. कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. 🙏 शुभ सकाळ 🙏
निःशब्द होण्याची वेळ तेव्हाच येते; जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही. "सुप्रभात"
नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते ........ गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची। 🌺 !! शुभ सकाळ !! 🌺
नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल , तर तुटणे अवघड आहे आणि जर स्वार्थाने झाली असेल , तर टिकणे अवघड आहे.. • _🌿शुभ सकाळ🌿_•
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि, नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.. कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका.. कधी चूक झाल्यास माफ करा, पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.. जन्म हा एका थेंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं.. पण मैत्री असते ती वर्तुळासारखी.. ज्याला कधीच शेवट नसतो… शुभ सकाळ!
नाती तयार होतात हेच खूप आहे, सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही, एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे… सुप्रभात!
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात, ती आपोआप गुंफली जातात, मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात, यालाच तर मैत्री म्हणतात… जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा, काहीतरी देण्यात महत्व असतं… कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं… शुभ सकाळ!
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा, काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा, नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं..!!🌺🌺 🌾🍁*शुभ सकाळ *🌾🍁 🌾🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌾🍁
नातं कधीच संपत नाही बोलण्यात संपलं तरी डोळ्यात राहतं अन डोळ्यात संपलं तरी मनात राहतं 👑😘🙏शुभ सकाळ🙏😘👑
नात..... म्हणजे काय ..*👫 ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये. आणी . कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये.. असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात 🌹🌼शुभ सकाळ🌼🌹
ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात ना जवळ राहील्याने जोडली जातात हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत. जे आठवणं काढण्याने आणखी मजबूत होतात
नशिबाला दोष का द्यावा ? स्वप्नं आपली असतील तर , प्रयत्न ही आपलेच असावे 👍 शुभ सकाळ 👍
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका..... तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे..... कोणी कितीही महान झाला असेल, पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही....... स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस...... देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
नळ बंद केल्याने नळ बंद होतो पाणी नाही घड्याळ बंद केल्याने घड्याळ बंद होते वेळ नाही दिवा विझवल्याने दिवा विझतो प्रकाश नाही असत्य लपवल्याने असत्य लपते सत्य नाही प्रेम केल्याने प्रेम मिळते वैर नाही दान केल्याने धन जाते लक्ष्मी नाही जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, पण… आयुष्य कसे जगायचे ते आपल्या हातात आहे… परमेश्वराचे स्मरण ठेवून हसा खेळा मस्ती करा, सगळ्यांच्या मनात आपली जागा निर्माण करा… शुभ सकाळ!
न हरता, न थकता, न थांबता, प्रयत्न करणाऱ्यांसमोर, कधी कधी “नशीब” सुद्धा हरते… पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच… शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची, आठवण काढत नाही.. पण मला मात्र आपल्याला रोज शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही… शुभ सकाळ!
दोन चमचे साखर मैत्रीची, एक चमचा चहा पावडर भेटीची, मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची, टाका, दुधाची धार हास्याची, पिऊन तर पहा, असल्या पण मैफिलीचा चहा.! || शुभसकाळ ||
दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे !!! 🌹 शुभ सकाळ 🌹
दुःखाला सांगा 'खल्लास' प्रत्येक दिवस असतो 'झक्कास' नका होऊ कधी 'उदास' तुम्ही आहात एकदम 'खास' आनंदी रहा प्रत्येक 'क्षणास' प्रत्येक क्षण जगायचा ठेवा मनी 'ध्यास' असू द्या स्वतःवर नेहमी 'विश्वास' सर्व मित्रांना शुभ-प्रभात
दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक "फुलहार" तयार होतो.. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की "माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं.. ।। सुप्रभात ।।
दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला गुड मॉर्निंग
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा, ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची… सकाळच्या सुंदर शुभेच्छा !
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ प्रभात
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल. आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल...., मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल...!!! 🌹 शुभ सकाळ 🌹
तुमच्यासमोर"पुढे-पुढे करणारे " किती लोक "खरे" आहेत; हे महत्वाचे नाही.. तर तुमच्या पाठीमागे" किती लोक तुमच्यासाठी "विश्वासू"आहेत हे महत्वाचे. 🌺 शुभ दिवस🌹
तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा.. .. स्वामी विवेकानंद 🙏🌸 शुभ सकाळ 🌸
तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल.... माणसाला बोलायला शिकण्यास किमान २ वर्ष लागतात ... पण "काय बोलावे" हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो..यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला..इतरांच्या पावलांवर चालण्यापेक्षा असे काही करा की लोकं तुमच्या पावलांवर चालतील. Good morning
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.... .